Friday 28 February 2014

कवठाची उपासाची चटणी

कवठाची उपासाची चटणी

साहित्य  : एक मोठ्ठे ताजे कवठ( चांगले तयार कवठ हातात घेऊन हलवले तर आतल्या गाराचा खुळखुळ्यासारखा आवाज ऐकू येतो) , आवश्यकतेनुसार गूळ / साखर ,चवीनुसार मीठ व जिरेपूड
कृती :  कवट फोडून आतला गर एका मोठ्या काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊन त्यात चवीनुसार गूळ / साखर व मीठ आणि स्वादासाठी एक छोटा चमचा जिरेपूड घालून मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत ढवळा व मुरू द्या.
ही चटणी उपवासाला चालते त्यामुळे खास करून आषाढी एकादशी किंवा महाशिवरात्रीला करतात. 

Thursday 27 February 2014

रताळ्याचा कीस (तिखट मिठाचा)

रताळ्याचा कीस (तिखट मिठाचा)

साहित्य : ५-६ रताळी, शेंगदाण्याचे भरड कूट, हिरव्या मिरच्या ,मीठ ,जिरे, साखर व साजूक तूप (रिफाईंड तेल सुद्धा चालेल)
कृती : प्रथम रताळी स्वच्छ धुवून घ्या,किसणीवर रताळी किसून घ्या ,कीस पाण्याने धुवून चाळणीत निथळत ठेवा, मग गॅसवर एका मोठ्या कढईत तीन चमचे तूप किंवा तेल गरम करून त्यात जिरे व चवीनुसार हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करून घ्यावी व त्यात रताळ्याचा कीस घालून परतून घेऊन झाकण ठेवून एक मोठी वाफ देऊन शिजवून घ्या,मग झाकण काढून त्यात शेंगदाण्याचे भरड कूट , चवीनुसार मीठ व साखर घालून उलथन्याने ढवळून घेऊन झाकण ठेवून  पुन्हा एक वाफ आणून घ्या व गॅस बंद करा. पांच मिनिटे झाकण तसेच ठेऊन वाफ आताच जिरू ध्या.
पांच मिनिटांनी झाकण काढा व डीशमधून सर्व्ह करा. 

Wednesday 26 February 2014

दुधी भोपळ्याची सुकी भाजी

दुधी भोपळ्याची सुकी भाजी

साहित्य : एक माध्यम आकाराचा दुधी भोपळा , पाव वाटी मुगाची डाळ , चवीनुसार लाल तिखट , धणे-जिरे ह्यांची पूड अर्धा चमचा,ओल्या पाव वाटी नारळाचा खवलेला चव , चवीनुसार मीठ , आवडीनुसार एक-दोन चमचे साखर , फोडणीसाठी तेल , मोहोरी , जिरे , हळ, हिंग  व हिरव्यामिरच्यांचे तुकडे , पाव वाटी शेंगदाण्याचे कूट , अर्धा कप दूध.

कृती : दुधीची भाजी करायला घेण्यापूर्वी एक तास आगोदर मुगाची डाळ कोमट पाण्यात भिजत घालून ठेवावी. दुधी भोपळ्यावरची साले काढून घेऊन मग विळीवर दुधीच्या माध्यम आकाराच्या फोडी करून घ्या,गॅसवर माध्यम आचेवर भाजीसाठी पातेले  पातेले तापत ठेवा,ते चांगले तापल्यावर त्यात फोडणीसाठी तेल घालून ते तापल्यावर त्यात प्रथम मोहोरी घालून टी तडतडल्यावर जिरे,हिंग व हळद घालून फोडणी करा व लगेचच त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे व मुगाची डाळ घालून थोडेसे परतून  घेऊन मग दुधीच्या फोडी घालून ढवळून घ्या  व अर्धा मिनिट झाकण ठेवा, झाकण काढल्यावर त्यात थोडे गरम  पाणी घालून भाजी शिजवून घ्या , नंतर त्यात धणे-जिरयाची पूड , लाल तिखट , चवीनुसार साखर व मीठ घालून भाजी ढवळून घ्या , मग त्यात शेंगदाण्याचे कूट , ओल्या नारळाचा चव व गार दूध घालून भाजी ढवळून घेऊन पुन्हा एकदा झाकण ठेवून भाजी थोडा वेळ शिजू द्या , थोड्या वेळाने झाकण काढून भाजी चांगली मिळून आलेली आहे का ते पहा व रसही पुरे दाट झाला असल्यास गॅस बंद करा.






Tuesday 25 February 2014

दह्यातील शेंगदाण्याची चटणी


दह्यातील शेंगदाण्याची चटणी



साहित्य : १ वाटी दही,पाव वाटी शेंगदाण्याचे भरड कुट,चवीनुसार २ हिरव्या मिरच्या किंवा अर्धा चमचा तिखट,जीरेपूड (इच्छेप्रमाणे),बारीक चिरून कोथिंबीर (इच्छेप्रमाणे),चवीनुसार साखर व मीठ. फोडणीचे साहित्य. 

कृती :  साखर आणि मीठ दह्यामध्ये घालून दोन्हीही चांगले विरघळेपर्यंत ढवळावे,मग बाकीचे साहित्य दह्यात घालुन पुन्हा डावलून चांगले एकजीव करून घ्यावे व हवी तर वरुन फोड
णी करून ह्या चटणीत घालावी व पुन्हा ढवळून घ्यावी. 

Monday 24 February 2014

कारल्याचे वेफर्स

कारल्याचे वेफर्स 


साहित्य : रसरशीत ताजी कार्ली २५०ग्राम,आवश्यकतेनुसार तळणीसाठी तेल,चवीनुसार लाल तिखट व मीठ
कृती : प्रथम कारली स्वच्छ धुवून व कोरडी करून घ्या,दोन्ही बाजूंचे शेवटचे टोकाचा भाग कापून टाका,उरलेल्या कारल्याचे विळीवर अतिशय पात्तळ काप / चकत्या करून घ्या,गॅसवर एका कढईत तेल तापवून घेऊन त्यात हे पात्तळ काप टाकून तळून घ्या व एका चाळणीवर काढून घेऊन तेल निथळून घ्या. एका ताटात हे तळलेले गरम काप घेऊन त्यावर चवीनुसार लाल तिखट व मीठ घालून हाताने चोळून सगळीकडे सारखे लागेल असे बघा.
झाले हे कारल्याचे वेफर्स खाण्यासाठी तय्यार !
खास करून ज्यांना मधुमेह आहे त्यांच्या साठी हे वेफर्स फारच आरोग्यदायी व उत्तम आहेत. 

Sunday 23 February 2014

खमंग मेथीचे मुटके

खमंग मेथीचे मुटके



साहित्य : एक  मध्यम आकाराची मेथीची जुडी , एक वाटी डाळीचे पीठ(बेसन) , चवीनुसार लाल तिखट , थोडीशी बारीक  कोथिंबीर , दोन तीन चमचे पांढरे तीळ (भाजून) , १/२ चमचा धणे जिरे पूड, एक चमचा शेंग दाण्याचे कूट , चवीनुसार मीठ , चविसाठी थोडीशी साखर व किसलेला गूळ , हळद व कडकडीत तेलाचे मोहन
कृती : प्रथम मेथी निवडून व बारीक चिरुन घ्यावी , नंतर ती धुवून घेऊन चाळणीवर निथळत ठेवावी. नंतर मेथी व इतर सर्व सामान एकत्र करुन त्यावर कडकडीत तेलाचे मोहन घालून पीठ भिजवावे. नंतर त्याचे लांबट आकाराचे गोळे करावेत. नंतर कुकरमध्ये चाळणीला तेलाचा हात लावून त्यावर हे गोळे वाफवून घ्यावेत.गार झाल्यावर कढईत जरा जास्त तेलाची फोडणी करुन त्यावर परतवून घ्यावेत.
 हे मेथी मुटके उन्धिऊ भाजीत घालतात. जेवणात तोंडीलावणे म्हणून किंवा नुसते भज्यासारखे खायला सुद्धा चांगलेच लागतात. 

Saturday 22 February 2014

कोबी भात


कोबी भात


साहित्य ४ वाट्या  चिरलेला कोबी , एक वाटी तांदूळ, अर्धी मूठ मूगडाळ, एक चमचा धनेपूड, फोडणीसाठी एक डाव तेल, मोहरी, जिरे, चवीनुसार मीठ, एक मूठभर भाजलेले/तळलेले शंगदाणे, १०-१२ कढीपत्त्याची पाने, चिमूटभर हिंग, ५-६ पाकळ्या बारीक चिरलेला लसूण, एक चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, डू चमचे लिंबाचा रस , एक वाटी मटाराचे दाणे (मक्याचेही चालतील), २ते २.५ वाट्या, दोन चमचे साजूक तूप
कृती : तांदूळ, मूगडाळ धूवून निथळत ठेवा,कुकरमध्ये तेल घेऊन त्यात जिरे-मोहरी, कढिपत्ता, हिंग घालून फोडणी करा, मग त्यात बारीक चिरलेला लसूण घालून परता,नंतर हळद, चिरलेला कोबी, मटार (किंवा मक्याचे दाणे) घालून परता, शेवटी डाळ-तांदूळ घालून परता,आता त्यात तिखट, मीठ, धनेपूड, लिंबाचा रस घालून परता , दोन चमचे साजूक तूप घाला आणि परता,परतल्यानंतर त्यात दोन अडीच वाट्या पाणी घाला. परत एकदा चव बघून चवीनुसार तिखट, मीठ, लिंबाचा रस घालून कुकरला झाकण लावून ३ शिट्ट्या करा.
गरमा-गरम कोबीभातात शेंगदाणे घालून मिसळून घ्या व सर्व्ह करा.


Friday 21 February 2014

तिखट मिठाच्या पुर्‍या

तिखट मिठाच्या पुर्‍या

साहित्य : एक वाटी कणीक,अर्धी वाटी मैदा,दोन चमचे तांदूळाची पिठी,एक मोठा चमचा तिळ,एक छोटा चमचा ओवा,चवीपुरते तिखट व मीठ,पुर्‍या तळणीसाठी तेल,एक छोटा चमचा जिरे.
कृती :  एका मोठ्या परातीत कणीक,मैदा,व तांदूळाची पिठी घेऊन कोरडीच सर्व पिठे एकत्र करुण घ्यावीत,मग त्यात भाजून घेततेले तीळ ,ओवा व जिरे घालावे,तसेच चवीनुसार लाल तिखट व मीठ घालून पुन्हा एकदा कोरडेच मिक्स करून घ्यावे,दुसर्‍या एका भांड्यात गरम पाणी व कडकडीत तेलाचे मोहन घेऊन ते चांगले फेटून घ्या व नंतर ते फेटलेले गरम  तेल-पाणी वापरुन पुर्‍यांचे पीठ भिजवा व चांगले मळून परातीतच १०-१५ मिनिटे झाकून ठेवा.
गॅसवर कढईत पुर्‍या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवून तेल चांगले तापल्यावर पोळपाटावर एकदम पात्तळ अशा पुर्‍या लाटून घेण तेलात टाकून तळून काढा व तेल निथळण्यासाठी चाळणीत ठेवा.
गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या स्टीलच्या डब्यात भरून ठेवा.
ह्या पुर्‍या बरेच दिवस टिकतात त्यामुळे प्रवासात न्यायला किंवा दुपारच्या चहा बरोबर चाउ-म्याऊ म्हणून खायला उत्तम ! 

Thursday 20 February 2014

मेथी बटाटा पुरी

मेथी बटाटा पुरी


साहित्य  : एक वाटी भरून ताजी स्वच्छ धुवून बारीक चिरलेली मेथी,एक मोठ्ठा बटाटा उकडून कुस्करलेला ,तीन चमचे चणा डाळीचे (बेसन) पीठ,अर्धी वाटी ज्वारीचे पीठ ,एक वाटी कणीक (गव्हाचे पीठ),एक चमचाभर पांढरे तीळ,चवीनुसार मीठ व लालतिखट किंवा वाटलेली हिरवी मिर्ची,दोन-तीन लसणाच्या पाकळ्या ठेचून,थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर,आवशकतेनुसार तळणीसाठी गरम तेल 
कृति : वर दिलेले सर्व साहित्य एकत्र करून थोडेसे पाणी घालून पुर्‍यांसाठी मऊसर पीठ भिजवावे, ओल्या प्लॅस्टिकच्या कागदावर  हाताने गोलसर पुर्‍या थापून गॅसवर कढईत कडक तेलात सोनेरी रंगावर तळाव्यात.

या झाल्या खमंग मेथी-बटाटा पुर्‍या तय्यार !
सर्व्ह करतांना सोबत खाराच्या मिरच्या, लोणचे, किंवा एखादी चटणी वगैरे तोंडीलावणे द्यावे.