Thursday 27 October 2016

बटाटा पुर्‍या

बटाटा पुर्‍या 

साहित्य : ३-४ मध्यम आकाराचे बटाटे,एक वाटी कणीक,एक वाटी ज्वारीचे पीठ,अर्धी वाटी बेसन (चणा डाळीचे पीठ),दोन टेबलस्पून तांदूळाची पिठी,चवीनुसार मीठ,चिमूटभर हळद,एक छोटा चमचा लाल तिखटाची पावडर,एक चमचा जिरे पूड,एक चमचा तीळ,एक छोटा चमचा ओवा,अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर,एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा,पाव वाटी ताजे घट्ट मलईचे दही.
कृती : प्रेशरकुकरमधून बटाटे उकडून घ्यावेत.कुकरमधून काढल्यावर सोलून गरम असतानाच बटाट्यांचा पूरणयंत्रावर लगदा करून ठेवा किंवा किसणीवर किसून ठेवा.
एका परातीत हा बटाट्याचा लगदा किंवा कीस घेऊन त्यात कणिक,ज्वारीचे पीठ,बेसन,तांदूळाची पिठी,हळद,लाल तिखटाची पावडर, मीठ ,हिरव्या मिरच्यांचा ठेचा, जिरेपूड, तीळ,ओवा,मलईचे घट्ट ताजे दही घालावे व लागेल तसे पाणी घालून पुर्‍यांसाठी घट्ट पीठ मळावे.तेलाचे मोहन घालून पुन्हा मळावे. १५-२० मिनिटे ओल्या सूती कपड्याने झाकून बाजूला ठेवावे. १५ मिनिटांनी कपडा काढून पुन्हा एकदा पीठाला तेलाचा हात लावून कणिक मळतो तसे मळून घ्यावे. परातीला पीठ चिकटता कामा नये.
या मळून घेतलेल्या पिठाचे लिंबाएव्हढे गोळे करून ठेवावेत. एकेक गोळा लाटून बेताच्या आकाराच्या पुर्‍या लाटून तळावे व आपल्याला आवडत्या लोणचे किंवा, चटणी बरोबर सर्व्ह करा

Sunday 23 October 2016

ब्लॅक ब्यूटी

ब्लॅक ब्यूटी

साहित्य : एक मोठे डाळिंब,५०० ग्राम काली द्राक्षे, २५० ग्राम हिरवी द्राक्षे,५-६ स्ट्रॉबेरी किंवा दोन टेबलस्पून स्ट्रॉबेरी क्रश,दोन सफरचंद,चवीनुसार लिंबाचा रस,आवडीनुसार साखर,आवडीनुसार चाट मसाला,कोळा रंग (ऐच्छिक),आवश्यकतेनुसार बर्फ.
कृती : डाळिंब सोलून डाळींबाचे दाणे काढून घ्या.दोन्ही प्रकारची द्राक्षे आणि स्ट्रॉबेरी स्वच्छ करून व धुवून घ्या. सफरचंदाची साले सोलून काढा व सफरचंदातील बिया काढून बारीक फोडी चिरून ठेवा.
सगळ्या फळात दोन ग्लास पानी घालून मिक्सरवर फिरवून रस काढून चाळणीतून गाळून घ्या.
काढलेल्या रसात लिंबाचा रस,मीठ,साखर,चाट मसाला,कोलाचा रंग आणि बर्फ घालून छान मिक्स करा.
हा ज्यूस सर्व्हिंग ग्लासमध्ये भरून कॉकतेल स्टिक किंवा बामु स्टिक मध्ये स्ट्रॉबेरी,द्राक्ष किंवा सफरचंदाची फोड टोचून तीसटीक ज्यूसच्या ग्लासमध्ये ठेवून सर्व्ह करा.

पालक मकई भाजी

पालक मकई भाजी

आम्ही सारे खवय्ये's photo.आम्ही सारे खवय्ये's photo.





ही भाजी हॉटेलमध्ये हमखास ऑर्डर केली जाते.
साहित्य : एक जुड्डी पालक,एक वाटी मक्याचे कोवळे दाणे,एक कांदा, एक टोमॅटो, आल्याचा पेभर तुकडा, ८-१० लसणाच्या पाकळ्या,३-४ हिरव्या मिरच्या,एक चमचा जिरे,चवीनुसार मीठ,एक छोटा चमचा काळीमिरी पूड,एक टेबलस्पून लोणी.
कृती : सुरवातीला पालकची पाने निवडून स्वच्छ धुवून व वाफवून घ्यावी व मिक्सरवर वाटून त्याची प्यूरी बनवून ठेवावी. मक्याचे दाणे वाफवून घ्यावेत. कांदा व टोमॅटो बारीक चिरून ठेवावा. जिरे,आले,मिरच्या व लसणाच्या पाकळ्या मिक्सरवर वाटून त्याची पेस्ट बनवून ठेवा.
आता गवार एका पॅनमध्ये दोन चमचे लोणयात ही मिक्सरवर वाटून ठेवलेली जिरे,आले,मिरच्या व लसणाची पेस्ट घालून चांगली परतून घ्यावी मग त्यात बारीक चिरून ठेवलेला कांदा व टोमॅटो घालून पुन्हा २-३ मिनिटे परतावे. मग पालकची प्यूरी व वाफावलेले मक्याचे दाणे घालून आणखी २-३ मिनिटे परतावे. एक छानशी उकळी काढून घ्यावी.शेवटी चवीनुसार मिठव काली मिरीपूड घालून मिक्स करून घुण गॅस बंद करा.
ही भाजी गरम असतांनाच त्यावर लोणी घालून पोळी किंवा परठ्यासोबत सर्व्ह करा.

ABC हलवा- अ‍ॅपल, बनाना, कॅरट हलवा

ABC हलवा- अ‍ॅपल, बनाना, कॅरट हलवा

साहित्य : एक वाटी साले काढलेल्या सफरचंदाच्या बारीक फोडी,एक वाटी केळ्याचे बारीक काप,एक वाटी गाजराचा कीस,एक कप दूध,एक वाटी ओल्या नारळाचा चव,एक वाटी तूप,दोन वाट्या साखर,एक चमचा वेलची पूड,सजावटीसाठी बदाम,काजू,पिस्ते इ.
कृती : प्रथम गॅसवर एका नॉनस्टिक पॅन मध्ये गाजराचा कीस दुधात शिजवून घ्या. नंतर त्यात केळ्याचे बारीक काप व सफरचंदाच्या बारीक फोडी आणि साखर घालून एक सारखे हलवत राहून केळी व सफरचंद दोन्ही गाजराच्या किसाशी एक जीव होऊन हलवा तयार होईपर्यंत शिजवा. आता त्यात तूप व वेलची पूड घालून ५-७ मिनिटे शिजवून गॅस बंद करा.थंड झाल्यावर सर्व्हिंग बाउल्समध्ये काढून घ्या व वर बदाम,काजू व पिशते यांचे काप घालून सजवा आणि सर्व्ह करा.

Thursday 20 October 2016

विर्दभ स्पेशल सोल्याची भाजी

विर्दभ स्पेशल सोल्याची भाजी

साहित्य : एक वाटी हिरव्या तुरीचे दाणे,एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो,एक चमचा आले-लसणाची पेस्ट, चवीनुसार २-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर,एक छोटा चमचा लाल मिरचीचे तिखट,एक छोटा चमचा हळद ,एक छोटा चमचा जिरे पूड,अर्धी वाटी तूप,एक टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ.
कृती :प्रथम गॅसवर एका पॅनमध्ये थोडसे तेल गरम करून त्यात हिरव्या तुरीचे दाणे २-३ मिनिटे परतून घेऊन एका थाळीत थंड होण्यासाठी काढून ठेवा.थंड झाल्यावर मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या. उरलेल तेल त्याच पॅनमध्ये घालून गरम करावे व त्यात बारीक चिरलेला कांदा घालून पांच मिनिटे सोनेरी रंगावर परतून घेऊन मग त्यातच आल लसूण पेस्ट, हिरवी मिरची व कोथिंबीरिची पेस्ट घालून परतावे.नंतर लाल मिरचीची पूड, हळद व जिरे पूड घालून परतावे.
साधारण २-३ मिनिटांनी मिक्सरवर वाटून घेतलेले हिरव्या तुरीच्या दाण्यांचे वाटण घालावे.चवीनुसार मीठ घालावे.
पुरेसे पाणी व बारीक चिरलेला टोमॅटो घालावा.पॅनवर झाकण ठेवून ५-७ मिनिटे मंद आंचेवर शिजू दयावे.
गॅस बंद करून बाजूला करावे.चवीनुसार किंवा आवडीनुसार तूप घालून गरमच पोळी-चपातीसोबत सर्व्ह करावे.

टाकळ्याची तंबळी

                                                              टाकळ्याची तंबळी
                                                                           

साहित्य- एक वाटी टाकळ्याची पाने, एक वाटी ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, दीड वाटी ताक, चिंच, मिरे, जिरे, तूप, मीठ इ.
कृती - कढईत तुपावर टाकळ्याची पाने परतावीत. मग त्यात मिरे, जिरे घालून आणखी दोन मिनिटे परतावे. मग अन्य साहित्य घालून मिक्सरमध्ये वाटावे आणि नंतर ताकात मिसळावे. पोटाच्या विकारासाठी ही टाकळ्याची तंबळी फार उपयुक्त आहे.

परफेक्ट डाळ तडका !!

परफेक्ट डाळ तडका !!

साहित्य : दोन वाट्या तुरीच्या डाळीचे वरण (शिजवलेले) , एक कांदा उभा चिरून , ८-९ लसूण पाकळ्या ठेचून ,
आल पाव इंच आले किसून , एक चमचा प्रत्येकी जीरे , मोहरी व हळद पावडर , चवीनुसार लाल मिरची पावडर , अर्धा चमचा गरम मसाला पावडर,चार अक्खी मिरी , हिंग एक चमचा , लाल मिरची ओलि चिरून , अर्धी वाटी
कोथिंबीर , एक मोठा टोमाटो उभा चिरून , ७-८ कढी पत्ता पाने , दोन चमचे तेल , एक ते दोन चमचे बटर
चवीनुसार मीठ (एक ते दीड चमचा)
कृती : गॅसवर एका कढईत तेल तापत टाकून जिरे ,मोहरी, मिरी ,आल ,लसूण ,कढीपत्ता , चिरलेली लाल मिरची
व कांदा घालून परतून घ्या ,त्यात टोमॅटो घालून परता , त्यात हिंग ,हळद पावडर, गरम मसाला , लाल मिरची पावडर व मीठ घालून परता , त्यात शिजलेली तूर डाल घालून व थोडस पाणी घालून उकळी येवू द्या.
त्यात एक ते दोन चमचे अमूल बटर घाला व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवा !!
मस्त झणझणीत परफेक्ट डाळं तडका तय्यार !!!

परफेक्ट डाळ तडका !!

परफेक्ट डाळ तडका !!

साहित्य : दोन वाट्या तुरीच्या डाळीचे वरण (शिजवलेले) , एक कांदा उभा चिरून , ८-९ लसूण पाकळ्या ठेचून ,
आल पाव इंच आले किसून , एक चमचा प्रत्येकी जीरे , मोहरी व हळद पावडर , चवीनुसार लाल मिरची पावडर , अर्धा चमचा गरम मसाला पावडर,चार अक्खी मिरी , हिंग एक चमचा , लाल मिरची ओलि चिरून , अर्धी वाटी
कोथिंबीर , एक मोठा टोमाटो उभा चिरून , ७-८ कढी पत्ता पाने , दोन चमचे तेल , एक ते दोन चमचे बटर
चवीनुसार मीठ (एक ते दीड चमचा)
कृती : गॅसवर एका कढईत तेल तापत टाकून जिरे ,मोहरी, मिरी ,आल ,लसूण ,कढीपत्ता , चिरलेली लाल मिरची
व कांदा घालून परतून घ्या ,त्यात टोमॅटो घालून परता , त्यात हिंग ,हळद पावडर, गरम मसाला , लाल मिरची पावडर व मीठ घालून परता , त्यात शिजलेली तूर डाल घालून व थोडस पाणी घालून उकळी येवू द्या.
त्यात एक ते दोन चमचे अमूल बटर घाला व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवा !!
मस्त झणझणीत परफेक्ट डाळं तडका तय्यार !!!

Thursday 13 October 2016

फोडणीची भाकरी (किंवा पोळी अथवा भात)

फोडणीची भाकरी (किंवा पोळी अथवा भात) 


साहित्य :
ज्वारीच्या शिळ्या भाकर्‍या, गाजर, बीट कीसून आणि कच्चे मटाराचे कोवळे दाणे ,वाटीभर दही, हिरवी मिरची, कोथिंबीर, अर्धी मूठ शेंगदाणे, चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर साखर, फोडणीसाठी तेल, जीरे, हिंग.
कृती:
शिळ्या ज्वारीच्या भाकर्‍यां अगदी बारिक कुस्करुन घ्या. मिक्सरमधून बारिक केल्या तरी चालेल. गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करून त्या गरम तेलात हिंग-जिर्‍याची फोडणी करावी,त्यात कढीपत्त्याची पाने घालून परतून घ्यावीत व नंतर त्यामध्ये बारिक चिरलेली हिरवी मिरची, शेंगदाणे, किसलेले गाजर , बीट आणि कच्चे मटाराचे कोवळे दाणे घालून दोन मिनिटे परतून घ्यावे व कढईवर पाणी घालून एक ताट झाकण ठेवून मंद आंचेवर शिजू ध्यावे, मग कुस्करलेली भाकरी घालून परतावे व भाकरीचा कुस्करा वाफवून घ्यावा. नंतर त्यामध्ये दही, चिरलेली कोथिंबीर, मीठ, साखर घालून व झार्‍याने चांगले हलवून एकत्र मिक्स करून घेऊन एक वाफ काढून गॅस मंद करावा.
या डीशला शिळ्या भाकरीचा चिवडा असेही म्हटले जाते तर यालाच मराठवाड्यात ‘माणिक-पैंजण’ या भारदस्त नावाने ओळखले जाते.कोणी याला ‘साप्ताहिकी’ असेही म्हणतात. तर ही उपहाराची वन-डिश-मिल म्हणूनही ओळखली जाते. यात आपण इतर बर्‍याच भाज्या चिरून / किसून घालून याचे पोषण मूल्यही वाढवू शकतो. बर्‍याच लोकांना ही डिश एव्हढी आवडते की ही करता यावी म्हणून दोन भाकर्‍या जास्त करून मुद्दाम उरवतात.

फोडणीच्या शेवया

फोडणीच्या शेवया

साहित्य : दोन वाट्या भरून गणेश हातशेवया – कुस्करुन , दोन चमचे शेंगदाण्याचे कूट, तेल, चवीनुसार ३-४ हिरव्या मिरचयांचे बारीक तुकडे , मीठ व साखर- एक चमचा लिंबाचा रस , मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर , जिरे व मोहोरी
कृती : प्रथम कढईत शेवया चांगल्या लालसर रंग येइपर्यंत कोरड्याच भाजून घ्याव्यात व एका परातीत (अथवा ताटात) खाली पेपरचा एकेरी कागद पसरून काढून घ्याव्यात. (पेपर न टाकल्यास त्या खाली ताटाला चिकटून बसतात)
मग गॅसवर कढईत तेलाची खमंग फोडणी करून तीत मिरच्या, जीरे , मोहोरी व हिंग घालून शेवटी भाजून घेतलेल्या शेवया घालाव्यात. पुन्हा नीट परतून, बेताबेताने गार पाणी घालावे (सर्व शेवया बुडतील इतपत). नीट हलवून घेऊ कढईवर झाकण ठेऊन दरदरून एक वाफ येऊ द्यावी. मग वरून दाण्याचे कूट, चवीनुसार मीठ, साखर, लिंबाचा रस घालून पुन्हा व्यवस्थित हलवून मिक्स करावे व दणदणीत वाफ काढावी. सर्व शेवया एक एक धागा दिसली पाहीजे, गिच्च गोळा होता कामा नये. शेवया मऊ, मोकळ्या शिजल्या पाहीजेत. खायला देताना वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून व सोबत लिंबाची फोड देऊन सर्व्ह करा. .

Sunday 9 October 2016

चटपटीत मसाला कॉर्न



चटपटीत मसाला कॉर्न

साहित्य : एक वाटीभर कोवळे अमेरिकन मक्याच्या कणसाचे दाणे. टेक टेबलस्पून अमूलचे बटर,चवीनुसार लाल मिरचीचे तिखट,मीठ व लिंबाचा रस
कृती : एका मायक्रोवेव्ह स्पेशल बाउलमध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करून चमच्याने हलवून नीट मिक्स करून घेऊन दोन मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये ठेवून वाफवून घ्या.
चटपटीत मसाला कॉर्न खायला द्या.

मलई पनीर कोफ्ता

मलई पनीर कोफ्ता 


साहित्य : २-३ उकडलेले बटाटे,२५० ग्रॅम पनीर,चवीनुसार मीठ, २-३ टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर ,फिलिंगसाठी १०-१२ काजूचे तुकडे व १०-१२ बेदाणे,तळणीसाठी गरजेनुसार तेल
ग्रेव्हिसाठी साहित्य :  ६-७ टोमॅटो,आल्याचा छोटा तुकडा,१०-१२ काजूच्या पाकळ्या,१०-१२ मकाणे,वाटीभर फ्रेश क्रीम,अर्धी वाटी दूध,चवीनुसार मीठ,अर्धा चमचा जिरे,२-३ टेबलस्पून तेल,एक वाटी दही,२-३ लाल सुक्या मिरच्या,एक छोटा चमचा हळद,एक चमचा गरम मसाला,अर्धी मूठ चिरलेली कोथिंबीर,सजावटीसाठी फ्रेश क्रीम.
कृती : कोफ्त्यासाठी एका बाउलमध्ये उकडलेले बटाटे, पनीर,चवीनुसार मीठ, कॉर्नफ्लॉवर घ्या व त्यात थोडेसे तेल आणि जरूरी पुरते पाणी घालून कुस्करून व मळून घेऊन त्याचे पिठाचा घट्ट गोळा बनवा. मग त्या पिठातून छोटे लिंबाएव्हढे गोळे घेऊन त्यात काजूचे तुकडे व बेदाणे घालून छोटे छोटे कोफ्ते बनवून घ्या व एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊन त्यात ते कोफ्ते शॅलोफ्राय करा.
ग्रेव्हिसाठी काजूच्या पाकळ्या अर्धी वाटी दुधात अर्धा तास  भिजत घालून ठेवा व नंतर मिक्सरच्या भांड्यात भिजत घातलेल्या काजुच्या पाकळ्या,चिरलेले टोमॅटो,दूध,मकाणे व आल्याचा तुकडा घालून वाटून त्याची पेस्ट बनवा.  
आता एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करून घ्या व त्यात जिरे टाकून ते तदतडल्यावर मग त्यात टोमॅटो-काजूची पेस्ट घाला व ब्राऊन रंगावर परतून घ्या. परतून घेत असतांना काढाईला सगळीकडून तेल सुटायला लागले की त्यात लाल सुक्या मिरच्या,चवीनुसार मीठ,धने पूड व हळद घालून थोड्या वेळ परता आणि मग त्यात दही,फ्रेश क्रीम , थोडेसे पाणी व डाळ घाला आणि ५-७ मिनिटे शिजवा. नंतर त्यात टाळून ठेवलेले कोफ्ते घाला व २-३ मिनिटे शिजवून घेऊन गॅस बंद करा.
सर्व्हिंग बाउल्समध्ये मलई पनीर कोफता काढून घेऊन त्यावर फ्रेश क्रीम आणि चिरलेल्या कोथिंबीरीने सजावट करून सर्व्ह करा.